News


सीएसएमएसएस संस्थेकडून मुख्यमंत्री दुष्काळ निधीस २५ लाखांची मदत

सामाजिक भान जपत बळीराजाला मदतीचा हात - छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या (CSMSS) वतीने 'मुख्यमंत्री दुष्काळ सहाय्यता निधी' साठी २५ लाख रुपयांची भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.