News


छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमधील SBI बँक ATM चा शुभारंभ

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमधील SBI बँक ATM चा शुभारंभ  संस्था सचिव मा. पद्माकरकाका मुळे यांच्या शुभहस्ते आज पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. बी. आय. सरव्यवस्थापक मा. राजेशकुमार तर प्रमुख पाहुणे म्हणून एस. बी. आय. उपसरव्यवस्थापक मा. रविकुमार वर्मा, एस. बी. आय. सहाय्यक सरव्यवस्थापक श्रीमती. सुधाप्रकाश एस. बी. आय. सहाय्यक सरव्यवस्थापक मा. सुरेश यामियार उपस्थित होते.         यावेळी एस. बी. आय. शाखा व्यवस्थापक मा. तन्मय चव्हाण व्यवस्थापक मा. आशिष वट्टमवार नोडल ऑफिसर मा. ओम तोटेवाड, नोडल ऑफिसर मा. सुहास कुलकर्णी, संस्था प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, कृषि महाविद्यालय संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, जनसंपर्क अधिकारी श्री. संजय पाटील आदी उपस्थित होते.